sakal (12).jpg 
अर्थविश्व

फास्टटॅग डिजिटल सिस्टीम होतीय लोकप्रिय; महिन्यात वाढले 1.35 कोटी व्यवहार   

सकाळ ऑनलाईन टीम

राष्ट्रीय महामार्गावर टोल भरण्यासाठी लागू करण्यात आलेल्या डिजिटल सिस्टीम फास्टटॅग मार्फत डिसेंबर महिन्यात झालेली वसुली 2,303.79 कोटी रुपये झाली. व डिसेंबर महिन्यात झालेली ही टोल वसुली मागील महिन्यापेक्षा (नोव्हेंबर) 201 कोटी रुपये अधिक झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) याबाबतची माहिती मंगळवारी जाहीर केली. ज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर डिजिटल सिस्टीमद्वारे टोल भरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे एनएचएआयने म्हटले आहे.    

एनएचएआयने जाहीर केलेल्या माहितीनुसार, फास्टटॅगच्या माध्यमातून होणाऱ्या टोल व्यवहारात 1.35 कोटींची वाढ झाली आहे. याशिवाय डिसेंबर महिन्यात झालेली टोल वसुली ही नोव्हेंबर महिन्यापेक्षा 201 कोटी रुपयांनी अधिक असल्याचे एनएचएआयने प्रसिद्ध केलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे. मागील वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात टोल भरण्यासाठी झालेले व्यवहार 12.48 कोटी होते. व या व्यवहारातून 2,102,02 कोटी रुपये टोल वसुली झाली होती. तर डिसेंबर महिन्यात यात वाढ होऊन 13.84 कोटींची भर पडली असून 2,303.79 कोटी रुपये टोल वसुली झाली आहे.    

नवीन वर्षाच्या 1 जानेवारी 2021 पासून राष्ट्रीय महामार्गावर टोल भरण्यासाठी फास्टटॅगची अंमलबजावणी अनिवार्य करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र ज्यांनी अजूनही फास्टटॅग वापरण्यास सुरवात केलेली नाही अशांसाठी आणि त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंतची अतिरिक्त मुदत एनएचएआयकडून देण्यात आली आहे. त्यामुळे 15 फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रीय महामार्गांवर हायब्रीड लेन (रोख पेमेंट) ची सुविधा उपलब्ध असणार आहे. परंतु त्यानंतर  टोल भरताना फास्टटॅग नसल्यास वाहनचालकांना टोलची दुप्पट रक्कम भरावी लागणार असून, त्यासोबतच अशा वाहनांना थर्ड पार्टी विमा देखील देण्यात येणार नाही. टोलची प्रक्रिया आता संपूर्णपणे डिजिटल होणार असून, टोल प्लाझावरील रोख व्यवहार थांबवले जाणार आहेत.        

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT